दिवाळी

 नमस्कार मित्रानो, मनाली म्हात्रे .दिवाळी हा सण अंधारावर प्रकाशाचा, अज्ञानावर ज्ञानाचा आणि वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करतो.हा सण 'दीपावली' या नावानेही ओळखला जातो, ज्याचा अर्थ 'दिव्यांची रांग' असा होतो.लोक आपले घर दिवे, फुलांच्या माळा आणि सुंदर रांगोळीने सजवतात. घराबाहेर पणत्या लावल्या जातात, ज्या ज्ञानाचा प्रकाश पसरवण्याचे प्रतीक आहेत. दिवाळीत विविध प्रकारचे पदार्थ आणि मिठाई बनवली जाते. नातेवाईक आणि मित्रमंडळी एकमेकांना भेटवस्तू आणि मिठाई देतात, ज्यामुळे संबंध अधिक घट्ट होतातधनत्रयोदशी या दिवशी लक्ष्मीचे स्वागत केले जाते आणि लोक नवीन वस्तू खरेदी करतात.लक्ष्मी पूजन या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करून समृद्धीची मागणी केली जाते.दिवाळी हा फक्त प्रकाशाचा सण नाही, तर तो प्रेम, आनंद आणि नात्यांची जपणूक करण्याचाही सण आहे..दिवाळी या नावातच उत्साह आहे, आनंद आहे. दिवाळीचे दिवस म्हणजे नातेवाईकांच्या भेटी, भेटवस्तूंची देवाणघेवाण, मुलांसाठी फटाके आणि नवीन कपडे, दारात रांगोळी, कंदील आणि पणत्यांची आरास ! हे आपण दरवर्षी करतोच. अलीकडच्या धकाधकीच्या जीवनात बरेचदा या सणाचा आनंद आपण एखाद्या पर्यटनस्थळी जाऊनही घेतो आणि नवा उत्साह मनात साठवून परत येतो. पण दिवाळीच्या सणामागील आशय मात्र आपल्याला फार थोडा माहिती असतो. या वर्षी जरा विस्ताराने जाणून घेऊया दिवाळी सणाची

Comments